ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शुल्लक कारणावरून मारहाण दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 ग्रामीण भागातील फिर्यादीच्या तक्रारीवरून घरगुती शुल्लक कारणावरून देऊळगाव राजा येथे बस स्थानकात मारहाण केल्याप्रकरणी दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील दगडवाडी येथील फिर्यादी शिवहरी अण्णा डोईफोडे वय 48 वर्ष राहणार डोईफोडेवाडी तालुका देऊळगाव राजा यांना त्यांच्या गावातीलच माझ्या आई सोबत वाद का केला या कारणावरून दोघांनी संगणमत करून लाकडी रॅप्टरने दोन्ही पायावर तसेच डाव्या हाताच्या दंडावर मारहाण करून जखमी केले तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आणि मेडिकल रिपोर्ट वरून आरोपी आतिश उर्फ अक्षय शिवहरी डोईफोडे वय 25 वर्ष क्रमांक दोन आदिनाथ शिवानंद जायभाय वय 24 वर्ष राहणार दगडवाडी यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गवई करत आहेत

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये