ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

क्रीडा संकुल चंद्रपूर येथील अथलेटीक स्पर्धेत लखमापूर शाळेची बाजी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महाराष्ट्र ॲथलेटीक्स संघटना व डी.एन.आर.ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक अजिंक्यपद ॲथलेटीक्स स्पर्धा २०२४ – २५ चे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे करण्यात आले होते*. त्यात अंबुजा फाउंडेशन ने केलेल्या सहकार्याने व मुख्याध्यापक, शिक्षक यांनी केलेल्या मार्गदर्शनाने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लखमापूर चे विद्यार्थ्यांना 6 स्पर्धेत यश मिळाले आहे.दुर्वेश अनिल तावीलकर गोळा फेक,व भालाफेक दोन्ही स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे

बजरंग शंकर कोडापे उंची उडी मध्ये *द्वितीय क्रमांक खुशी विनोद मुक्के ट्रायथॉलाँग क्रिडाप्रकारात तृतीय आराध्या किशोर कोडपे २००मिटर धावणे तृतीय क्रमांक, वरील ६ खेळाडू स्पर्धकापैकी चार खेळाडू जिल्ह्याच्या यादीमध्ये चमकले.लखमापूर गावातून शाळेचा आणि विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक होत आहे.

आयएसओ नामांकित जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लखमापूर, साठी अंबुजा फाउंडेशन विभागीय व्यवस्थापक श्रीकांत कुंभारे,शिक्षण विभाग समन्वयक सरोज अंबागडे यांच्या मार्गदर्शनात चैताली कन्नाके,अनिकेत दुर्गे यांनी मेहनत घेतली.विजयी खेळाडूंचं सर्व शिक्षक गावातील सर्व समिती तर्फे अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये