ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लखमापूर येथेआरोग्य तपासणी शिबिर संपन्न 

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लखमापूर येथील शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

आरोग्य तपासणी १२ ऑगस्ट ला करण्यात आली.यामध्ये मुलांच्या शरीरावरील डाग ,ताप, स्पीच थेरपी, लघवीतील काय अडचणी, पोट पाठ सर्व शरीराचे आरोग्य तपासणी करण्यात आली सदर तपासणी दरम्यान 100% मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

सोबतच शाळेतील सर्व शिक्षकांची आरोग्य तपासणी करण्यात आली तपासणी मध्ये.

बीपी शुगर थायराइड शरीरावरील डाग शरीरावरील गाठी वरील सर्व रोगांची तपासणी करून सर्व विद्यार्थ्यांना आरोग्य कार्ड देण्यात आले.

सर्व रोगावर मार्गदर्शन केल्या गेले. तपासणी दरम्यान शाळेतील सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

आरोग्य तपासणीसाठी गडचांदूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर चंदनखेडे मॅडम आणि त्यांच्या यांनी आरोग्य तपासणी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये