ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमदार डॉ.पंकज भोयर यांच्या मार्गदर्शनात निराधार शिबिराचे आयोजन

वर्धा जिल्हा महसूल विभागाचा मोठ्या उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

संदिप पुंडेकर वर्धा तहसीलदार कार्यक्रमात उपस्थित

महसूल विभागांतर्गत संजय गांधी निराधार योजना या शिबिराचे आयोजन विकास भवन वर्धा येथे करण्यात आले होते या शिबिराला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले वर्धा जिल्हाचे आमदार डॉ पंकज भोयर तसेच वर्धा तहसीलचे तहसीलदार संदीप पुंडेकर,नायब तहसीलदार डॉ शकुंतला पराजे तथा प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले संजय गांधी निराधार कमिटीचे अध्यक्ष दुर्गेश पांडे शहर विभाग वर्धा व तसेच संजय गांधी निराधार योजना ग्रामीण विभागचें अध्यक्ष फारुख शेख व शहर विभाग व ग्रामीण विभाग निराधार कमेटी योजनेचे सदस्य श्रीमती शितल अतुल डोंगरे नौशाद शेख बलराम ठाकुर संजय बघेल सतिश वैद्य संजय जाधव सौरभ देशमुख सुमित वैद्य विनोद भारद्वाज यांच्यासह संजय गांधी निराधार योजनेचे ग्रामीण सदस्य या शिबिरामध्ये उपस्थित होते संजय गांधी निराधार योजने अंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज यावेळेस प्रशासनातर्फे विकास भवन वर्धा येथे घेण्यात आले तर काहींना निराधार योजनेचे प्रमाणपत्र सुध्दा देण्यात आले या शिबिरामध्ये लाभार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या सदर शिबिराचे आयोजन दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी विकास भवन वर्धा येथे सकाळी 11 ते 5 या दरम्यान घेण्यात आले आहे.संजय गांधी निराधार लाभार्थ्यांचे शिबिर हे प्रत्येक मंडळ प्रमाणे विभागणी सुध्दा करण्यात आली आहे.

आमदार डॉक्टर पंकज भोयर तहसीलदार संदिप पुंडेकर नायब तहसीलदार डॉ. शकुंतला पराजे यांच्या उपस्थितीमध्ये अनेक लाभार्थ्यांचे अर्ज त्यांच्या समस्या व इतर बाबी समजून घेण्यात आल्या तर नवीन लाभार्थ्यांना लाभ सुध्दा देण्याचे काम आमदार डॉक्टर पंकज भोयर यांच्या उपस्थितीत करण्यात आले तर एक टेबल खिडकीमध्ये करण्यात आले आहे या निराधार शिबिरा मध्ये नवीन निराधार योजना नोंदणी करणे तसेच जीवन प्रमाणपत्र नोंदणी करणे आणि तलाठी मार्फत उत्पन्न प्रमाणपत्र देणे सदर योजनेसाठी लागणाऱ्या संपूर्ण कागदपत्राची माहिती या शिबिरात देण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये