Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अथक परिश्रम घेतल्याने जिज्ञासा ची आय आयटी दिल्ली येथे प्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- जिददीला परिश्रमाची जोड असली, तर यश त्याच्यापुढे नक्कीच पायघड्या घालले या उक्तिची अनुभुती विद्येची नगरी असलेल्या ब्रम्हपुरी येथील कु. जिज्ञासा मनोहर कलंत्री या युवतीने दिली आहे.

जिद्द, परिश्रम, यामुळेच जिज्ञासाने स्थानिक ने. हि. महाविद्यालयामधून २०१० मध्ये बिएससी भौतिकशास्त्र, इलेक्ट्रानिक्स विषय घेवून पूर्ण केले.

तसेच पुढिल शिक्षणाकरिता इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स नागपूर येथुन एमएससी भौतिकशास्त्र या विषयामध्ये २०१२ मध्ये सुवर्णपदकासह यशाला गवरुनी घातली.

जिज्ञासा येथेच न थांबला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठाची पेट परिक्षा, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठावी सेट परिक्षासुद्धा पास केल्य याब दरम्यान गेट परिक्षेचा अभ्यास करून प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन आय आय टि दिल्ली येथे भौतिकशास्त्र या विषयामध्ये एमटेक ला प्रवेश घेतलेला आहे.

बम्हपुरी ते आयआयटी दिल्ली या प्रवासामध्ये जिज्ञासाची जिद परिश्रम तसेच पालकांचा असलेला पाठींबा यामुळेच यश जिज्ञासात्पूढे पायघड्या घालत असल्याचे दिसते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये