ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखेर व्याहाड बूज. येथील युवकाचा प्रेत सोनापुर नदीपात्रात मिळाला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

   सावली तालुक्यातील व्याहाड बूज. येथील १८ वर्षीय युवक आर्यन यादव सातपैसे हा युवक इयत्ता १२ वी मध्ये नवभारत विद्यालय व्याहाड बूज. येथे शिक्षण घेत होता. दिनांक 22 सप्टेंबर रोजी सकाळी ८:०० वाजेच्या सुमारास स्वतःची गाडी घेऊन शौचालयास जातो असे घरी सांगून निघून गेला.

११:०० वाजेच्या सुमारास त्याची गाडी वैनगंगा नदीच्या पुलावर आढळून आली. घरच्या लोकांनी सर्व नातेवाईकाकडे, आजूबाजूला, गावात, बाहेर चौकशी केली असता तो कुणाच्याच घरी मिळाला नाही. त्यामुळे सावली पोलीस स्टेशनला त्याचे वडील यादव सातपैसे यांनी आर्यन यादव सातपैसे हरविल्याची तक्रार दिली.

   तेव्हापासून सावली पोलीस आणि घरचे व्यक्ती त्याचा शोध घेत होते मात्र त्याचा तपास कुठेही लागलेला नव्हता. अखेर १९ दिवसानंतर दिनांक 11 ऑक्टोंबर रोजी सोनापूर नदीपात्रातील पाण्याच्या टाकीजवळ एक प्रेत झाडाला लटकलेला आढळून आला असल्याची माहिती मिळाली. यावरून सावली पोलीस यांनी चौकशी केली असता तो प्रेत व्याहाड बूज. येथील आर्यन यादव सातपैसे याची असल्याचे सिद्ध झाले.

     सदर प्रकरणाचा संपूर्ण तपास सावली ठाण्याचे ठाणेदार श्री आशिष बोरकर आणि त्यांचे सर्व सहाय्यक पोलीस कर्मचारी यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये