ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दारू प्यायला पैसे दिले नाही म्हणून महिलेस मारहाण 

दोन आरोपीविरोधात गून्हा दाखल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून महिलेस व तीच्या देरास मारहाण केल्याप्रकरणी दोन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदर घटना दगडवाडी येथे 29 ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता घडली.

सविस्तर वृत्त असे की फिर्यादी भगवान महादेव काकडे यांची भावजय पानकोर बाजीराव काकडे हिस आरोपी समाधान बाजीराव काकडे हा दारु पिण्यासाठी पैसे मागत होता. भावजय ने पैसे दिले नाही या कारणावरुन फिर्यादी यांचे भावजय हिस लोटपाठ केली असता फिर्यादी हे समजावुन सांगणेसाठी गेले असता आरोपी यांनी संगणमत करुन आरोपी फिर्यादी चे दोन्ही हात धरले व अन्य आरोपी शितल काकडे हिने तिचे हातात काठी घेवुन फिचे डावे हाताचे पंजावर जोराने काठीने मारले त्यामुळे फिचे हात फॅक्चर झाले फिर्यादीचे तोंडी व वैदयकिय रिपोर्ट वरुन पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्लये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल माधव कुटे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये