ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलिसांची मोहा दारूवर प्रो. रेड

एकूण 88 हजाराचा मुद्देमाल नाश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

    दिनांक 01/08/24 रोजी मुखबिर कडून मिळालेल्या माहिती वरून पुलगावं पोलीस स्टेशन हद्दीत मौजा विजय गोपाल शेतशिवार येथे प्रो.रेड केला असता स्वप्निल झोरे रा. विजय गोपाल हा प्लास्टिक ड्रम मध्ये मोहा सोडव्या मध्ये पाणी टाकताना मिळून आला सदर घटनास्थळावरून 3 प्लास्टिक ड्रम मध्ये अंदाजे 600 लिटर मोहा सोडवा रसायन व तीन प्लास्टिक कॅनमध्ये अंदाजे 60 लिटर गावठी मोहा दारू व इतर असा एकूण किंमत 88,000/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आला तो पंचा समक्ष जागीच नाश केला.

सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक नुरूल हसन साहेब तसेच अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण साहेब पोनि राहुल सोनवणे यांचे मार्गदर्शनात डीबी पथकाचे पो.हवा चंद्रशेखर चुटे, रवींद्र जुगनाके, उमेश बेले यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये