प्रियकरानेच केली प्रियसीची हत्या
ढगा जंगलात आढळलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
ढगा जंगल परिसरात गुरूवार 22 मे रोजी तरुणीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा तर्फे समांतर तपास करीत असता त्यांनी जिल्यातील तसेच आजू बाजूच्या जिल्ह्यातील हरविलेल्या व्यक्तीबद्दल माहिती घेतली असता पोलीस स्टेशन सावंगी येथे दिनांक ०९-०५-२०२५ लक्ष्मी मानसिंग धुर्वे (वय 26) रा. येळाकेळी” या तरुणीची हरविल्या बाबत ची तक्रार दाखल होती स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम ने मृत तरुणीची आणि हरविलेली तरुणीच्या अंगावरील कपडे दागीने व चप्पल हरविलेल्या तरुनिवेच असल्याची खात्री तिच्या नातेवायीकांकडून करून घेतल्यावर स्थानीक गुन्हे शाखेच्या टीमने तपासाचे चक्र फिरविले. त्यानंतर तांत्रिक माहिती तसेच गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी लक्ष्मी हिचा प्रियकर दिनेश्वर वर्मा रा. बेळाकेळी याला ताब्यात घेत विचारपूस केली असता दिनेश्वर वर्मा यानेच 9 मे रोजी लक्ष्मी हिला बगा जंगल परिसरात नेत तेथे तिचा ओढणीने गळा आवळून तिची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यावरून पोलीस स्टेशन कारंजा येथे खुणाचा गुन्हा दाखल करून आरोपी दिनेश्वर वर्मा यास अटक करण्यात आली असून सदरचा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.
सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन अपर पोलीस अधीक्षक श्री सागर रतनकुमार कवडे, राहुल चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव यांचे मार्गदर्शनात श्री विनोद चौधरी पो नि स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत राठोड, बालाजी लालपालवाले, अमोल लगड, राहुल इटेकर, पोलीस अंमलदार, सुभाष राऊत, संतोष दरगुडे, नरेंद्र पराशर, सचिन इंगोले, चंद्रकांत सुरंगे, राम इप्पर, धर्मेंद्र अकाली, प्रमोद पिसे, भूषण निघोट, महादेव सानप, पवन पन्नासे, रामकिसन इप्पर, मनीष कांबळे, राहुल अदवाल, संघसेन कांबळे, मिथुन जीतकार हर्षल सोनटक्के, नितीन इटकरे, नितीन मेश्राम, नवनाथ मुंढे तसेच सायबर सेलचे दिनेश बोधकर विशाल मडावी अनुप कावळे अक्षय राऊत गोविंद मुंडे अंकित जीभे यांनी केली
पुढील तपास कारंजाचे ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात कारंजा पोलिस करीत आहे.