ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सांवगी मेघे पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध घेवून 12 तासाचे आत गुन्हे उघडकीस 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 20.05.2025 रोजी फिर्यादी राजेश मारोतरावजी लाडेकर रा. सालोड यांनी पो.स्टे ला रिपोर्ट दिला त्यांचे मालकीची टि.व्हि.एस. स्पोर्ट मो.सा. क. एम.एच 32 ए.क्यू. 0230 ही दि. 17.05.2025 चे रात्री 1000 वा ते दि. 18.05.2025 चे सकाळी 07:00 वा चे सुमारास त्यांचे घरासमोरून कोणत्यातरी अज्ञात ईसमाने चोरून नेली अषा फिर्यादी यांचे तोडी रिपोर्टवरून पो.स्टे सावंगी येथे अपू.क. 426/2025 कलम 303(2) भा.न्या.स. प्रमाणे नोंद आहे.

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून मा. ठाणेदार साहेब यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पोलीस स्टेशन -सावंगी मेघे येथील गुन्हे शोध पथक हे चोरीस गेलेल्या मोटरसायकल तसेच आरोपीचे शोधात असताना त्यांना मुखबीरकडून खात्रीशिर माहिती मिळाली की, एक ईराम सावंगी ते सालोड रोडवरील सैनी हॉटेलजवळ गुन्हयातील चोरीस गेलेली मोटरसायकल घेवून आहे अषा माहितीवरून सदर आरोपीत्त ताब्यात घेवून त्याचेकडून पोस्टे. सावंगी मेघे येथील नमुद गुन्हयातील चोरीस गेलेली टि.व्हि.एस. स्पोर्ट मो.सा. क. एम.एच 32 ए.क्यू., 0230 ही जप्त करून 12 तासाचे आत गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कार्यवाही ही गा. पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर साहेब यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक श्री संदिप कापडे सा. ठाणेदार पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांचे निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार पो.हवा सतिश दरवरे, पोहा संजय पंवभाई पोहया अनिल वैदय, निलेष सवमाके, निखील फुटाणे, यांनी केली, पुढील तपास पोहवा अनिल वैद्य हे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये