ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कुख्यात गुंड याचेवर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये नागपूर कारागृहात रवानगी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन वर्धा (शहर) हद्दीतील कुख्यात गुन्हेगार दिपक ऊर्फ सोनू विजय वासनिक, वय ३१ वर्ष, रा. इतवारा बाजार, वर्धा याचेविरुध्द पोलीस स्टेशन वर्धा (शहर) चे अभिलेखावर शरीराविरूध्द सन २००९ पासुन २०२३ एकुण २६ गुन्ह्यांची नोंद आहे. ज्यामध्ये दरोड्याचा प्रयत्न, खुनाचा प्रयत्न, भारतीय हत्यार कायद्यान्वये शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणे, शासकिय वाहनाची तोडफोड करून यासारखे गंभीर गुन्हे स्थानबध्द करण्यात आलेल्या इसमावर नोंद होते. स्थानबध्दाने पोलीस स्टेशन वर्धा शहर परिसरात आपल्या गुन्हेगारीने दहशत निर्माण केली होती.

स्थानबध्द दिपक ऊर्फ सोनू विजय वासनिक याच्या कृत्यांमुळे पोलीस स्टेशन वर्धा शहर अंतर्गत येणाऱ्या परीसरामध्ये सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होत असल्याने याचेविरुध्द ठाणेदार वर्धा (शहर) यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हाथभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने श्री. राहूल कर्डीले, जिल्हा दंडाधिकारी, वर्धा यांना तत्कालीन पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांनी सादर केला होता. सदरहु प्रस्तावाचा मा. जिल्हा दंडाधिकारी यांनी गांभीयाने दखल घेवुन कुख्यात गंड दिपक ऊर्फ सोनू विजय वासनिक, इतावारा बाजार, वर्धा याचा दिनांक २१.०२.२०२४ रोजी स्थानबध्द आदेश जारी करण्यात आला, त्यास नागपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.

वर्धा जिल्ह्याचा अनेक वर्षाचा कालावधी लक्षात घेता मागिल वर्षभराचे कार्यकाळात एम.पी.डी.ए. कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. मा. जिल्हादंडाधिकारी तसेच मा. जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कार्यकाळात आजवर एकूण ११ गुंड प्रवृत्तीचे, अवैध दारु व्यवसाय करणाऱ्यांना कारागृहात स्थानबध्द करण्यात आलेली आहे. आगामी सार्वत्रीक लोकसभा निवडणुका लक्षात घेता भविष्यातील निवडणुका निर्भिड वातावरणात पार पाडण्याचे उद्देशाने भविष्यात सुध्दा वर्धा जिल्ह्यातील शरीराविरुध्दचे गुन्हे करणारे गुन्हेगार, दारुविक्रेते, रेती माफीया अशा गुंड प्रवृत्तीचे लोकांविरुध्द उपरोक्त कायद्यान्वये कठोर प्रभावी कार्यवाही करण्याचे पुनःश्च संकेत मा. जिल्हाधिकारी, वर्धा व मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी दिलेले आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड स्था.गु.शा. वर्धा, पोलीस निरीक्षक रविन्द्र शिंदे पो.स्टे. वर्धा (शहर), पोउपनि अमोल लगड, सफी, संजय खल्लारकर, गिरीश कोरडे, पोहवा, अमोल आत्राम स्था.गु.शा. वर्धा, पोहवा, प्रदिप राउत, नापोअं. दिपक जंगले दोन्ही पोलीस स्टेशन वर्धा (शहर) यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये