Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

सर्वसामान्य जनतेसाठी आपला संघर्ष जोमाने सुरू राहील : सुभाष धोटे. 

राजुरा येथे काँग्रेसची चिंतन बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

राजुरा (ता.प्र) :– काँग्रेस जनसंपर्क कार्यालय राजुरा येथे माजी आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची चिंतन बैठक पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, क्षेत्रातील सर्वसामान्य जनता आपल्या सोबत भक्कमपणे उभी असून इव्हिएम मशीन मधील गडबड, प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून पैस्याच्या बळावर अनेक गैरप्रकारांचा वापर करून कुठेही वातावरण नसताना विरोधकांनी विजय मिळविला आहे अशी जनतेची धारणा आहे. त्यामुळे यापुढे पक्षसंघटना अधिक मजबूतीने सक्रिय करून सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य हक्कासाठी, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवा, महिलांचे प्रश्न, शिक्षण, आरोग्य, आणि क्षेत्रातील विविध ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपला संघर्ष जोमाने सुरू राहील असा एल्गार त्यांनी व्यक्त केला. आपल्या सोबत भक्कमपणे उभी असलेल्या क्षेत्रातील समस्त नागरिक, काँग्रेस तथा महाविकास आघाडी च्या सर्व घटक पक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले.

      यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्ष अरुण धोटे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीतील संपूर्ण परिस्थितीची कारणमीमांसा करून यापुढे आनखी उम्मेदीने, ताकदीने जनतेसाठी काम करून, संघटनात्मक बांधणी मजबूत करू असे सांगितले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे यांनी, आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. आपण कुठे कमी पडलो याचे आत्मचिंतन करून पुढे अधिक सक्षमपणे वाटचाल करू असे सांगितले. तर निर्मला कुडमेथे, नंदकिशोर वाढई, नानाजी आदे, कुंदा जेणेकर यांनी महिला शक्ती, युवा शक्ती, शेतकरी, कष्टकरी तसेच विविध घटकांना पक्षाशी मोठय़ा प्रमाणात जोडून पक्ष संघटना आनखी मजबूत करून पून्हा उभारी घेऊ अशी भावना व्यक्त केली. यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे पक्षसंघटना मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.

       यावेळी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, सभापती विकास देवाळकर, दिनकर कर्नेवार, नानाजी आदे, नंदकिशोर वाढई, महिला तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे, श्यामराव कोटणाके, जंगु पाटील येडमे, मेघाताई नलगे, कुंदाताई जेनेकर, संध्याताई चांदेकर, शालु लांडे, संगिता धोटे, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, हरजित सिंग संधु, गजानन भटारकर, विलास तुमाने, साईनाथ बतकमवार, निळकंठ खेडेकर, अँड. रामभाऊ देवईकर, एजाज अहमद, कोमल फुसाटे, जगदीश बुटले, अनंता एकडे, देवेंद्र कल्लुरी, रामभाऊ ढुमणे, मंगेश गुरूनुले, अशोक राव, सुधाकर बानकर, मधुकर झाडे, प्रभाकर उईके, सुरेश पावडे, लक्ष्मण ऐकरे, सुरेश चन्ने, सुधाकर उईके, मधुकर सत्रे, अँड. चंद्रशेखर चांदेकर, उमेश गोनेलवार, प्रणय लांडे, इंदूबाई निकोडे, पूनम गिरसावळे, मनिषा देवाळकर, सय्यद साबिर, अनंता ताजणे, अमित आत्राम, दिपक झाडे, संघपाल देठे, संदीप नन्नवरे, रवी करमनकर शाहनवाज कुरेशी यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये