ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसने लढवावा

अनिल सावजी यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघातील मतदार व जनता नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी राहिली असून बहुतेक मतदार काँग्रेसच्या विचारसरणीला धरून काम करीत आहे या मतदारसंघात आजही अनेक निष्ठावंत कार्यकर्ते 1978 पासून काम करीत आहे.

गेल्या अनेक वर्षापासून हा मतदार संघ आघाडी कडून लढत असल्यामुळे खऱ्या अर्थाने या निष्ठावंत कार्यकर्तावर अन्याय होत आहे यासाठी यावेळेस या मतदारसंघावर महाविकास आघाडीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी निवडणूक लढवून काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडावी अशी मागणी जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे माजी अध्यक्ष अनिल सावजी यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, काँगेस नेते खा राहुलजी गांधी, खा मुकुलजी वासनिक, शरदचंद्रजी पवार, उद्धवजी ठाकरे,संजय राऊत, राहुल भाऊ बोंद्रे,यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये