Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रा. डॉ. संतोष देठे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

       श्री. शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथे दिनांक.६ जुलै ला महाविद्यालयात एक दिवशीय विद्यापीठ स्तरीय एन ई पी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने प्रा.डॉ.संतोष देठे यांच्या’तुकोबांच्या अभंगातील बुद्धीप्रामान्यवाद ‘या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे प्र-कुलगुरू मा.डॉ. श्रीराम कावळे यांच्या प्रमुख उपस्थित प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

यावेळी मान.डॉ. अनिल चिताडे, प्राचार्य, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय,चंद्रपूर, डॉ. मृणाल काळे , प्राचार्य,आनंदनिकेतन कॉलेज वरोरा, डॉ. रवींद्र हजारे इंग्रजी विभाग प्रमुख एस. बी. महाविद्यालय, अहेरी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.एस.एम. वारकड, प्राचार्य डॉ. आर आर. खेरानी, नॅक समन्वयक प्रा. विश्वास शंभरकर या मान्यवरांच्या उपस्थित प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

     डॉ. संतोष देठे यांच्या’तुकोबांच्या अभंगातील बुद्धीप्रमण्या वाद’या ग्रंथाला नुकताच रा. ग. जाधव राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांचे’क्रांतीदर्शी तुकाराम’,’निश्चयाचा मामेरू: प्रभाकरराव मामुलकर’,’संत तुकाराम: अंधश्रद्धा, विचार व चिंतन’हे ग्रंथ प्रकाशित असून”अश्रूंची फुले”आत्मकथन आणि”दलित साहित्य: आस्वाद व समीक्षा”हे दोन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहे. त्यांचे अनेक विषयावर लेख सुद्धा जर्नलस् मधून प्रकाशित झाले आहे. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी व मित्रपरिवारानी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये