Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजुरा येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर उत्साहात संपन्न

दृढ इच्छाशक्तीने स्वप्न साकार होतात - तहसीलदार ओमप्रकाश गोंड 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

   शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजुरा यांच्या वतीने राजुरा विधानसभा मतदारसंघातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोंडपिपरी, कोरपना आणि जिवती, सर्व शाळा महाविद्यालय, खाजगी आय.टी.आय., एम.सी.व्ही.सी., इतर शैक्षणिक संस्था यामधील विद्यार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी कन्नमवार सभागृह येथे एक दिवसीय छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर संपन्न झाले. सदर शिबिराचे उद्घाटन तहसीलदार ओमप्रकाश गोंड यांचे हस्ते झाले.

      प्रमुख अतिथी म्हणून पं.स. चे संवर्ग विकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे, प्राचार्य आर.बी. वानखेडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजुरा, गोंडपिपरी औ.प्र.संस्थेचे प्राचार्य नरेंद्र किलनाके, सेवानिवृत्त जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुशील बुजाडे, शास. औ.प्र. संस्थेचे गटनिदेशक बंडोपंत बोढेकर, सामाजिक कार्यकर्ते शाम हेडाऊ, सर्वसाधारण प्राचार्य एस.जी. तुर्के आदींची उपस्थिती होती.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य आर.बी. वानखेडे यांनी केले. त्यानंतरच्या सत्रात नव्या वाटा,नव्या दिशा या विषयावर शाम हेडाऊ यांनी विचार मांडले तर व्यक्तीमत्व विकास व ध्येय निश्चिती विषयावर बंडोपंत बोढेकर यांनी विचार व्यक्त केले. शिक्षणाच्या संधी या विषयी मार्गदर्शन केले. बेरोजगारी निर्मुलन म्हणजे कौशल्य विकास या विषयावर सुशील बुजाडे यांनी विचार मांडले तर करिअर कसे घडवावे या विषयावर हेमंत भिंगारदेवे यांनी विचार मांडले. समाज कल्याण विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना याविषयी संबंधित विभागाच्या प्रतिनिधींनी माहिती दिली.मार्गदर्शन केले. तसेच कौशल्य विकास अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांची माहिती तसेच समाज कल्याण कार्यालय मार्फत असलेल्या योजनांची माहिती संबंधित प्रतिनिधींनी दिली.

     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आर. जी. काळे, कु. चव्हाण निदेशिका यांनी केले .तर आभार प्रदर्शन श्री.‌ एस.जी. तुर्के यांनी केले.

    सदर शिबिराला राजुरा मतदारसंघातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी तसेच पालक वर्गांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सर्व शिल्पनिदेशक, निदेशक, कर्मचारी वृंद व संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये