ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महावितरण कंपनीचे खांब ऊभे करतांना मजुराचा मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

  महावितरण वितरण कंपनी चे कोरपना तालुक्यातील वनोजा येथे मत्ते यांचे शेतात 11KV लाईनचे खांब ऊभे करत असतांना खांब मजुराच्या अंगावर पडल्याने गंभिर जखमी झाला. जखमी झाला असल्यामुळे ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याना मृत घोषित केले.
जगन्नाथ लजपती कुळमेथे (24) रा. सिरशी तालुका राजुरा असे मृतकाचे नाव आहे. मृतक हा महावितरण कंपनीच्या दर्शन बुऱ्हाण या कंत्राटदारकडे मजूर म्हणून काम करत होता.

जोपर्यंत आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही असे नातेवाईकांनी मागणी केली. आ. सुभाष धोटे यांनी कंत्राटदाराकडून आर्थिक मदत मिळून देण्यासाठी प्रयत्न केले व कंत्रादाराकडून मृतकाच्या परिवाराला 2 लाख 60 हजार रुपये तात्काळ रोख रक्कम, भविष्यातील विमाची रक्कम व लागणारा खर्च देण्याची हमी दिली. गडचांदूर येथील महावितरण कंपनीचे कर्मचारी यांनी आपल्याकडून पैसे गोळा करून मृतकाला 25 हजार रुपयांची आर्थिक मदत केली.

यावेळी नगराध्यक्ष सविता टेकाम, गटनेता विक्रम येरणे, नगरसेवक राहुल उमरे, अरविंद मेश्राम, रुपेश चुदरी, गणेश पिपळशेंडे, महादेव हेपट यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये