स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांचे कडून मालवाहू चोरीचे दोन गुन्हे उघड
6 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक २४/१२/२०२४ ला फिर्यादी भारत फुंडे रा. दखनी फेल, पुलगाव. पो.स्टे पुलगाव येथे तक्रार दिली दी. २३-१२-२०२४ च्या २०.०० वो.ते २४-१२-२०२४ चे १०.०० वाजता दरम्यान त्यांचे मालकीची बोलेरो पि-कप चारचाकी वाहन क्र एम एच २३ डब्ल्यु ७७१८ कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे तक्रारी वरून पो. स्टे पुलगाव येथे अप क्र. १०३०/२०२४ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता कायदा नुसार सदरचा गुन्हा नोंद करून तपासावर होता. सदर गुन्ह्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा ला मिळताच समांतर तपास करीत असताना वाहन चोरी गेलेल्या घटनास्थळ परीसरातील सि.सि.टि.व्हि.ची पाहनी केली असता सदर बोलेरो पि-कप वाहन चोरी करताना काळ्या रंगाची बलेनो कार वापरण्यात आल्याचे निषपन्न झाले. मुखबीर व्दारे माहिती प्राप्त झाली की चोरी करण्याकरिता वापरलेली बलेनो कार पुलगाव येथील शहबाज नावाचा इसम वापरत असुन तो वाहन घेऊन हिन्दुस्तान कॉलोनी पुलगाव येथे आला आहे त्याच्या सोबत 2) मोहम्मद परवेज मोहम्मद नसीम उर्फ बब्बु वय 35 वर्ष, रा. चिलबिला जि.प्रतापगढ (उत्तर प्रदेश) ह.मु.मधुकर घुडे यांचे घरी हिन्दुस्तान कॉलोनी पुलगाव जि.वर्धा असल्याची खात्रीलायक प्राप्त गोपनीय माहिती वरुन नमूद आरोपिताना ताब्यात घेऊन त्यांची कसोशीने चौकशी केली असता.,
वरील दोन आरोपी त्यांचा साथीदार 3) सुफीयान खान रा.प्रतापगढ (उत्तर प्रदेश) याचे साहाय्याने बोलेरो पि-कप चारचाकी वाहन क्र एम एच २३ डब्ल्यु ७७१८ पुलगाव येथुन व चांदुर रेल्वे येथून टाटा कंपनीचे २०७ चारचाकी वाहन क्र.एम एच 12 इ एफ 7392 चोरले असून त्यासंबधी पो. स्टे. चांदुर रेल्वे अप क्र.:- 778/24. कलम- 303 (2) भा.न्या.सं. दाखल असल्याची माहिती प्राप्त केली. वरील चोरी केलेले दोन्ही वाहन आरोपीनी मुरदगाव रोडवरील लगतचे जंगल परीसरात लपवून ठेवल्याचे सांगितले. वरून 1) बोलेरो पिकप वाहन क्रमांक MH 23 W 7718 किंमत 5,00,000/- रू 2) टाटा 207 गाडी क्रमांक MH 12 EF 7392 किंमत 55,000/- रू 3) सुझुकी बलेनो कार क्रमांक MH 02 AV 3739 किंमत 60,000/- रू 4) एक रियल मी कंपनीचा मोबाईल किंमत 15,000/- रु असा एकूण जुमला किंमत 6,30,000/- रु जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपीना पुढील तपास कामी पोलीस स्टेशन पुलगाव यांच्या ताब्यात दिले असून सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा, पोउनि बालाजी लालपालवाले, अमोल लगड, राहुल इटेकर, पोलीस अंमलदार हमीद शेख, सचिन इंगोले, श्रीकांत खडसे, राजेश तिवसकर, प्रमोद पिसे, रामकिसन इप्पर, अरविंद इंगोले, उदय सोळंकी, मुकेश डोके सायबर सेल वर्धा अंमलदार दिनेश बोतकर, अनुप कावळे* यांनी केली आहे.