Sudarshan Nimkar
गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देशी दारू मालाची साठवणुक व विक्री करणाऱ्या आरोपीतांवर धडक कार्यवाही

एकूण 1 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

        हकिकत याप्रमाणे आहे कि, स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पथकाने मुखबीरचे खात्रीशीर खबरेवरून मौजा दारोडा मोटघरे ले-आउट वार्ड क्र 02 येथे आरोपी संतोष सोयाम याचे पानठेल्यामध्ये दारूबंदीबाबत प्रो.रेड केला असता, तेथे मोठ्या प्रमाणात देशी दारूने भरलेल्या सिलबंद शिश्या मिळुन आल्या असून, सदर दारूचा माल हा वडणेर येथील अवैध दारूविक्रेता विजेंद्रसींग उर्फ बापू जुनी याचे मालकिचा असून, तो माल तेथे लपवुन ठेवण्याकरीता त्याला पैसे मिळत असल्याचे सांगितल्याने, जागीचं मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून आरोपी संतोष सोयाम याचे ताब्यातून 13 सिलबंद खरर्ड्याचे खोक्यात प्रत्येकी 100 शिशा प्रमाणे 1,300 सिलबंद शिशा 90 एम.एल. च्या देशी दारूने भरलेल्या रॉकेट संत्रा नं. 1 कंपनीच्या प्रती शिशी कि. 100 रू प्रमाणे जु.किं. 1,30,000 रू चा माल जप्त करण्यात आला असून, आरोपी नामे 1) संतोष रघुनाथ सोयाम, वय 43 वर्ष, रा. मोटघरे ले-आउट वार्ड क्र 02 दारोडा तह. हिंगणघाट 2) विजेंद्रसींग उर्फ बापू जुनी रा. वडणेर (पसार) यांचेविरूध्द पो.स्टे. वडणेर येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. नुरूल हसन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डॉ सागर कवडे सा., यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. संजय गायकवाड सा. यांचे निर्देशाप्रमाणे, मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, संजय बोगा, अभिषेक नाईक यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये