Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेतीची चोरी करणा-या रेती तस्करांवर धडक कार्यवाही

04 टिप्पर व 01 ट्रकसह जु.किं.1 करोड 30 लाख 95 हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

  हकिकत याप्रमाणे आहे कि, स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. संजय गायकवाड सा. हे पथकासह पो.स्टे. अल्लीपुर परीसरातील सिरसगाव ते धोत्रा रोडवर रात्रग्रस्त पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांनी रोडनी जाणा-या 04 टिप्पर व 01 ट्रक यांना थांबवून पाहणी केली असता, त्यात रेती भरून असल्याचे दिसून आले. वाहन चालकांना रेती वाहतुकीचा परवाना व रॉयल्टी मागितली असता, त्यांनी नसल्याचे सांगितले. त्यावरून सदर वाहन चालक हे त्यांचे मालकांचे सांगणेवरून शेकापूर व दारोडा परीसरातील वर्धा नदीचे पात्रातुन रेतीची चोरी करीत असल्याचे निष्पन्न झाले. जागीच मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून वाहन चालकांचे ताब्यातून 1) एक 12 चक्का टिप्पर क्र. MH-40/CD-4859 कि. 30,00,000 रू व टिप्परमध्ये असलेली अंदाजे 10 ब्रास रेती कि. 50,000 रू एकुण कि. 30,50,000 रू. 2) एक 12 चक्का टिप्पर क्र. MH-40/CD-3959 कि. 30,00,000 रू व टिप्परमध्ये असलेली अंदाजे 10 ब्रास रेती कि. 50,000 रू एकुण कि. 30,50,000 रू 3) एक 10 चक्का टिप्पर क्र. MH-32/AK-3173 कि. 32,00,000 रू व टिप्परमध्ये असलेली अंदाजे 08 ब्रास रेती कि. 40,000 रू एकुण कि. 32,40,000 रू 4) एक LP 14 चक्का टिप्पर क्र. MH-27/BX-0777 कि. 22,00,000 रू व टिप्परमध्ये असलेली अंदाजे 08 ब्रास रेती कि. 40,000 रू एकुण कि. 22,40,000 रू 5) एक 06 चक्का ट्रक क्र. MH-31/CQ-3175 कि. 15,00,000 रू व ट्रकमध्ये असलेली अंदाजे 03 ब्रास रेती कि. 15,000 रू एकुण कि. 15,15,000 रू असा जु.किं. 1,30,95,000 रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपी वाहन चालक अनुक्रमे 1) विनोद तुलाराम आडे, रा. येळाकेळी 2) सुरेद्र नारायण सोमणकर, रा. येळाकेळी 3) रविंद्र नारायण हातघरे, रा. सालोड हिरापूर 4) शेख आसीफ शेख गफ्फार, रा. जमील कॉलोनी अमरावती 5) किसन भिमराव वाढोडकर, रा. सेवाग्राम, वाहन मालक – 6) प्रमोद उमाटे रा. गांधीनगर वर्धा 7) अतुल मोटघरे 8) शुभम ढोक रा. सालोड, 9) अलताब हसीयावाले रा. अमरावती 10) सूनिल रोहणकर रा. सेवाग्राम (अंबानगर) यांचेविरूध्द पो.स्टे. अल्लीपुर येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. नुरूल हसन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डॉ सागर कवडे सा., यांचे निर्देशाप्रमाणे, स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. संजय गायकवाड सा. यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात स.पो.नि. संतोष दरेकर सा., स.फौ. मनोज धात्रक, पो.हवा. अरविंद येनुरकर, संजय बोगा, पो.अं. दिनेक करलुके, अभिषेक नाईक यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये