ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
भरदिवसा मोटारसायकल लंपास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लॉक करून ठेवलेली मोटारसायकल भर दिवसा चोरी गेल्याची घटणा 17 मे रोजी सकाळी 8.30 वाजता घडली
सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी भिमराव जयाजी फुकट रा आरदखेडा ता जाफराबाद हे गाय खरेदी करण्यासाठी बैल बाजारात गेले असता, हॅन्डल लॉक करुन उभी केलेली मोसा काळा व लाल पटटा असलेली मोटारसायकल क्र.MH-21-K-4261 व किंमत अंदाजे 10,000/- रुपये किंमतीची गाडी कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद गवई करीत आहे.