ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमदार प्रतिभा धानोरकर यांची काँग्रेस कार्यालयाला भेट

काँग्रेस नेते स्व.किशोर बोबडे यांच्या चौदावी कार्यक्रमाला उपस्थित

चांदा ब्लास्ट
भद्रावती – वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच स्व.खासदार बाळू भाऊ धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभाताई धानोरकर यांनी दुपारी दोन वाजताच्या सुमारास शहर जनसंपर्क कार्यालयाला भेट देत
कार्यकर्त्यांशी संवाद साधला महिला कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना राजकिय क्षेत्रात कार्य करण्या संदर्भात मार्गदर्शन केले.
काँग्रेस शहर अध्यक्ष राजुरेड्डी व महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देत आमदारांचे सत्कार करण्यात आले.
24 जुलै रोजी काँग्रेस नेते किशोर बोबडे यांचे निधन झाले आज त्यांच्या चौदावी कार्यक्रमात सहभागी होत. स्व.किशोर बोबडे यांच्या धर्मपत्नी व महिला काँग्रेस शहर अध्यक्ष संगिता बोबडे व कुटुंबियांचे सांत्वन केले
याप्रसंगी महिला जिल्हा सचिव पदमा त्रिवेणी,महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, एस.सी.सेल शहर अध्यक्ष दिप्ती सोनटक्के, जिल्हा महिला सचिव दुर्गा पाटील,सुजाता सोनटक्के,पूनम कांबळे, प्रीती तामगाडगे, काँग्रेस नेते सैय्यद अनवर,शामराव बोबडे,अनिरुद्ध आवळे,रोशन दंतलवार,मोसीम शेख,विशाल मादर,तिरुपती महाकाली,शेख शम्मीउद्दीन,अरविंद चहांदे,निखिल पुनगंटी,अमित रामगिरी, देव भंडारी,शहजाद शेख, आकाश चिलका,अभिषेक सपडी,थॉमस अर्नाकोंडा,साहिल सैय्यद,सुनील पाटील,दिपक पेंदोर,अंकुश सपाटे,कपील गोगला, रंजीत राखुंडे,सन्नी कुम्मरवार व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते
शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये