Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

समर्थ कृषी महाविद्यालयातील रा.से. यो. शिबिराचा समारोप संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला सलग्न समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा द्वारा आयोजित राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विशेष हिवाळी निवासी शिबिराचा समारोप समारंभ हा ग्राम खाल्याळ येथे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी समारोप कर्ते डॉ. भगवान खरात, सुप्रसिद्ध साहित्यिक व्याख्याते देऊळगाव राजा यांनी अध्यक्ष पद भूषविले तसेच प्रमुख अतिथी डॉ. प्रफुल्ल ताठे, प्राचार्य समर्थ औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय देऊळगाव राजा, गजानन तिडके, लोकमत तालुका प्रतिनिधी अध्यक्ष देऊळगाव राजा, समर्थ कृषी महाविद्यालय प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे, प्रभाकर दंदाले, सरपंच खल्लाळ गव्हाण, बद्री दंदाले, माजी सरपंच खल्लाळ गव्हाण, श्रीकृष्ण बाजीराव दंदाले, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष व गावकरी मंडळी हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाची शोभा स्वागत गीताने वाढवली. रा.से.यो.च्या स्वयंसेवकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना व सेवा संस्कार व्हावा व तरुणांकडून राष्ट्रीय सेवा घडवी, युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा या हेतूने रा.से.यो. हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले . त्यानंतर रा.से. यो.च्या स्वयंसेवकांनी शिबिरातील आपला अभिप्राय व्यक्त केला.

त्यामध्ये वैष्णवी गोळे, रुतुजा वाघ, आदित्य ठाकरे, अर्जुन जाधव, अक्षय जाधव, श्वेता पवार व दुर्गा मापरी या स्वयंसेवकांनी शिबिरातील त्यांचा अनुभव सर्वांना सांगितला. अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. भगवान खरात यांनी शेतीच्या उज्वल भविष्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर मार्गदर्शन केले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी सर्व रासेयो च्या स्वयंसेवकांना यशस्वी शिबिराच्या शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले. समारोप समारंभ यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा किरण ठाकरे, सहकार्यक्रम अधिकारी प्रा अश्विनी जाधव, प्रा विलास सातपुते, प्रा विकास म्हस्के, प्रा सोनाली इंगळे यांनी परिश्रम घेतले.

संपूर्ण कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा ही ज्ञानेश्वर वाघ यांने सांभाळली व आभार प्रदर्शन ऋतुजा बनकर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये