ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी मयूर एकरे यांची नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर काही नेते व कार्यकर्ते अजित पवार गटात गेले तर काही शरद पवार सोबत आहेत.

कोरपना तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष नगर परिषद उपाध्यक्ष शरद जोगी अजित पवार गटात गेल्या मुळे रिक्त झालेल्या जागी युवा कार्यकर्ते पत्रकार मयूर एकरे यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट)जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी गडचांदूर येथे आयोजित केलेल्या बैठकीत नियुक्ती पत्र देऊन स्वागत करण्यात आले, याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस हिराचंद बोरकुटे, राजुरा विधानसभा प्रमुख अरुण निमजे,जिल्हा महासचिव रफिक निजामी,युवक काँग्रेसचे विधानसभा प्रमुख कुणाल गायकवाड,नगरसेविका कल्पना निमजे,मीनाक्षी एकरे,अश्विनी कांबळे,व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते,मयूर एकरे यांच्या नियुक्ती चे स्वागत केले जाते आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये