ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विश्वशांती विद्यालयाचा पृथ्वी सहारे चे एनएमएसएस शिष्यवृत्ती परीक्षेत यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती या परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून यात भारत शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथील पृथ्वी यादव सहारे हा विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे.

सदर विद्यार्थ्याला इयत्ता १२ वी पर्यंत १२ हजार रूपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.पृथ्वी सहारेच्या या यशाबद्दल भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे पदाधिकारी,विद्यालयाचे मुख्याध्यापक,पर्यवेक्षक, शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये