
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
वाघाच्या हल्ल्याची काल नांदगांव जाणि येथे बिबट्या च्या हल्ल्यात ३ झन जखमी झाल्याची घटना ताजी असताना आज दिनांक १३ एप्रिल रोजी दुसरी घटना मेंडकी वरून चार की.मी.अंतरावरील चीचखेडा येथे घडली आहे.
चिचखेडा येथील विनायक विठोबा जांभूळे हा आज सकाळी दहा वाजता च्या दरम्यान मोह फुल वेचायला गेला असता जंगलात कक्ष क्र १००३ मध्ये दबा धरून असलेल्या वाघाने विनायक वर हल्ला केला त्यात तो जागेवरच मरण पावला त्याला ब्रम्हपुरी येथील उप जिल्हा रुग्णालयात शव विच्छेदन साठी दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत.