Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

सांस्कृतिक स्पर्धेत नवेगाव भुज अजिंक्य

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

जुनासुरला येथील इंदिरा गांधी विद्यालयाच्या पटांगणात पंचायत समिती मुल शिक्षण विभागाअंतर्गत बेबाळ बिटाचे शालेय बालक्रीडा व सांस्कृतिक सम्मेलनाचे आयोजन दि.19,20,21,22 जानेवारी या चार दिवशी करण्यात आलेले होते.

    बेबाल बिटातील लहानमोठ्या सर्वच शाळांनी आपले क्रीडा व सांस्कृतिक कौशल्य दाखविण्यासाठी या सम्मेलनात उत्स्फूर्त सहभाग दर्शविला होता.

    सदर सम्मेलनात जि.प.उच्च प्राथमिक शाळा नवेगाव भुज या शाळेच्या चमुनेही सहभाग नोंदवून समूहनृत्य व वैयक्तिक नृत्य या स्पर्धेत प्रथम तर समूह गायन या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून सांस्कृतिक स्पर्धेच्या अजिंक्य ट्राफि च्या मानकरी ठरल्या. तर क्रीडा स्पर्धेत प्राथमिक मुलींचा कबड्डी यात प्रथम क्रमांक पटकावून तालुक्यावर मजल मारली.

बक्षीस वितरण कार्यक्रमात बक्षीस वितरक म्हणून माणिक पाटेवार,राजू पाटील मारकवार, बंडू रोहनकर,सरपंच रंजित समर्थ,विस्तार अधिकारी श्रीरंग कुमरे,केंद्रप्रमुख गजेंद्र कोपुलवार,फिस्कुटी शाळेच्या मुख्यध्यापक व कॉष्ट्राईब च्या जेष्ठ नेत्या रत्नमाला गेडाम सुरेश जिल्हेवार मंचावर उपस्थित होते.

 या यशात शाळेचे मुख्यध्यापक विजय बावने, विषय शिक्षक कैलास वाकडे,आकाश कुकुडकर,कु.किरण मानकर,

जगदीप दुधे,बालस्वामी कुमरे,उमाकांत दोडके,बंडू गेडाम या शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये