महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स मध्ये श्रीतेज फाउंडेशन यांच्या सहकार्याने आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या निर्देशानुसार दिनांक 21 जून 2025 ला सकाळी ६.३० ते ८.०० या दरम्यान महाविद्यालयाच्या पटांगणावर अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव, होते ,महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, क्रीडा व खेळ विभागाचे निर्देशक तसेच गडचांदूर शहरातील मान्यवर, महाविद्यालयातील संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, रासेयो चे स्वयंसेवक या प्रसंगी उपस्थित राहून योगाचे धडे घेतले.
योग प्रशिक्षक म्हणून डॉ. संजय आसूटकर, श्री गंम्पावार, तसेच खेतान मॅडम यांनी योगाचे महत्व पटवून देऊन रोजच्या जीवनात योगाची आवश्यकता पटवून दिली. सौं. स्मिता चिताडे मॅडम यांनी यावेळी सुदर्शन क्रियेचे महत्व सांगितले व रोज सुदर्शन क्रिया करावी असे प्रतिपादन केले.
योग दिनाच्या कार्यक्रमात श्री तेज प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री निलेश ताजने, श्रीतेज प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी, महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. साईनाथ मेश्राम , महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायंस चे सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, महात्मा गांधी विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, महात्मा गांधी स्कॉलर ऍकदमी च्या मुख्याध्यापिका कु. कुंडू मॅडम तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते.