
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली :- शहरातील वॉर्ड क्रमांक १२ मधील रंजना संजय कुडकेलवार यांचे राहते घरी(दि.९जून) ला धाडसी चोरी झाली. ही घरची मंडळी सोमवारी रात्री जेवण करून गाढ झोपले असताना अंधाराचा फायदा घेऊन रात्रीच्या सुमारास चोरी केली. दरम्यानसकाळी उठल्यावर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी सावली पोलिस ठाण्यात फिर्यादीने तक्रार दाखल केली आहे.
सावली नगरातील रंजना कुडकेलवार यांचे कुटुंब रात्री जेवण करून झोपी गेले होते.गाढ झोपेत असताना अंधाराचा फायदा घेत चोरांनी मागील स्वयंपाक गृहाच्या दारातून येऊन चोरी केली. नेहमीप्रमाणे सकाळी उठून स्वयंपाक गृहाकडे गेले असता दार उघडे दिसले.
मग पुढे जाऊन पाहिले असता घरातील कपाटही उघडे दिसून आले.कपाटात दागदागिने ठेवले होते. घरातील कपाटातून ११तोडे सोने,१.५किलो चांदी व २० हजार रुपये ठेवला होता. एकूण ६लाख५०हजार रुपयांचा मुद्देमाल तो चोरट्यांनी लांबविल्याचे रंजना कुडकेलवार याना दिसून आले. याबाबत सावली पोलीस ठाण्यात तक्रार केली असल्याचे सांगितले आहे.पोलीस विभागणी स्वानपथक पाचारण करून आरोपींचा शोध घेत होते.
अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३०५,३३१(४)BNSअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास प्रदीप पुलावर पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन मुसळे व सावली पोलीस करीत आहेत.