ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदुर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स मध्ये दिनांक 3 जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मा. विठ्ठलरावजी थिपे मंचावर उपस्थित होते. प्रमुख वक्ता म्हणून SAOS विद्यापीठ लंडन येथून परतलेले ऍड दीपक चटप हिते,ते म्हणाले की क्रांतिज्योती सावित्रीबाई मुले आजच्या मुली घराबाहेर पडून मनाप्रमाणे शिक्षण घेऊ शकतात. एकंदर स्त्री जातीवर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे अनंत उपकार आहेत. मात्र आज चे युवक मिळालेल्या या संधीचा उपयोग करण्यापेक्षा दुरुपयोग जास्त करताना दिसतात. वेळीच सावध झालो नाही तर परत पूर्वीसारखी परिस्तिथी निर्माण होईल. याप्रसंगी महात्मा गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ स्मिता चिताडे यांनी विद्यार्थिनींनी शिक्षणाचा उपयोग करून समाजातील दुर्लक्षित घटकांना ज्ञानी करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शैलेन्द्र देव हे म्हणाले की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन आपले आई वडील घेत असलेल्या मेहनतीचे चीज करावे.

गडचादुर येथील PSI सौ. निशा खोब्रागडे यांची सुध्दा उपस्थिती या कार्यक्रमाला होती. त्या म्हणाल्या की विद्या अर्जन करताना प्रत्येकानी आपल्या जीवनाचा उद्देश आणि स्वप्न ठेऊनच मार्गक्रमण करावे. या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय सेवा योजना युनिट चे डॉ घोडीले यांनी सूत्र संचालन केले तर प्रा. चेतन वैद्य यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये