पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा – तीन लाख छत्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त
सात आरोपींवर गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी
जितेंद्र चोरडिया चंद्रपूर
*स्थानिक गुन्हे शाखेची पोस्टे भिसी हद्दीत शंकरपूर येथे 52 तासपत्ते जुगार अड्यावर कारवाई*
आदरनिय सर…
भिसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंकरपुर येथे सुरू असलेल्या जुगाराच्या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल 3 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन सात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार दिनांक 31 ऑक्टोबरच्या रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी पो.स्टे. भिशी हददीत गस्तीवर असताना मुखबिरव्दारे माहिती मिळाली की, मौजा शंकरपूर येथिल शेत-शिवारात काही इसम 52 पानांचा जुगार खेळ खेळत आहे. ह्या खात्रीशीर माहीतीवरुन मौजा शंकरपुर शेत शिवारात जुगार रेड करून अखिल गुलाबराव मुनघाटे वय 39 वर्षे रा . हिरापुर ता. चिमूर व ईतर 6 इसमांना जागेवर पकडुन व ईतर इसमांवर महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये कारवाई करण्यात आली.
घटनास्थळावरून जुगारातील नगदी 41,500/- ₹ व 05 मोटार सायकल व ईतर साहित्य कि. 3,36,300/- रू असा एकूण 3,77,800/- रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष कारवाई करून जप्त करण्यात आला. आरोपी विरुध्द पो.स्टे.भीसी येथे अपराध क्रमांक 201 /2024 कलम 12 (अ ) म.जु.का.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची यशस्वी कारवाई सहा. पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार, दिपक काक्रेडवार पो उ नि मधुकर सामलवार संतोष निभोरकर पो हवा. किशोर वैरागडे, रजनीकांत पूठावार, नापोअ संतोष येलपूलवार पो.आ गोपाल आतकुलवार सर्व स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर ह्यांनी पार पडली.