ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
ब्राईट इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये महाराष्ट्र दिनी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
ब्राईट इंग्लिश मिडीयम स्कूल गडचांदूर येथे 1 मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण करण्यात आले व विद्यार्थ्यांच्या शाळेत झालेल्या विविध कार्यक्रमात उत्कृष्ट विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा विजय आकनुरवार,संस्थेचे अध्यक्ष जगदीश ठावरी, विकास अवघडे, प्राचार्य सौ निर्मला ठावरी उपस्थित होत्या, या प्रसंगी विध्यार्थी पालक शिक्षक उपस्थित होते