ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगरपरिषद प्रशासन विभाग वर्धा अंतर्गत वर्धा जिल्हास्तरीय नगरपरिषद / नगरपंचायत क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा – वर्धा जिल्हास्तरीय नगरपरिषद / नगरपंचायत कर्मचारी यांचे क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव सन २०२३-२४ तीन दिवसीय महोत्सवाचे दिनांक २२ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२३ दरम्यान नगरपरिषद प्रशासन विभाग वर्धा यांचेकडून आयोजन करण्यात आलेले होते. सदर कार्यक्रमाचे दिनांक २२ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे मा. जिल्हाधिकारी वर्धा राहुल कर्डिले यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी हर्षल गायकवाड, जिल्हा सह आयुक्त वर्धा, राजेश भगत, मुख्याधिकारी न.प. वर्धा, विजयकुमार आश्रमा, मुख्याधिकारी न.प. पुलगाव, सौरभ कावळे, मुख्याधिकारी न.प. देवळी,  किरण सुकलवाड, मुख्याधिकारी न.प. आर्वी, लक्ष्मीकांत कहार, मुख्याधिकारी न.प आष्टी (श), तसेच नगरपरिषद नगरपंचायत चे सर्व अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. या महोत्सवामध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ, रनिंग इत्यादी खेळांचा समावेश करण्यात आलेला होता तसेच या महोत्सवामध्ये अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. क्रिकेट या खेळामध्ये न.प. आर्वी विजेता संघ तर न.प. हिंगणघाट उपविजेता संघ ठरले. व्हॉलीबॉल मध्ये नगरपंचायत कारंजा (घा) विजेता संघ तर न.प. आर्वी उपविजेता संघ ठरले. कबड्डी या खेळामध्ये न.प. आर्वी विजेता संघ तर न.प. सिंदी रे उपविजेता संघ ठरले. बॅडमिंटन मध्ये न.प. आर्वी विजेता व न.प. पुलगाव उपविजेता, बुद्धिबळ मध्ये आष्टी विजेता व पुलगाव उपविजेता ठरले. कॅरम मध्ये वर्धा नगरपरिषद ने बाजी मारली.

दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षिस वितरण सोहळाचे मा. मनोजकुमार शहा, विभागीय सहआयुक्त नगरपरिषद प्रशासन नागपूर विभाग नागपूर यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सांघिक नृत्य मध्ये वर्धा न.प., जोडी नृत्य मध्ये नगरपरिषद प्रशासन विभाग वर्धा, नाट्य मध्ये न.प. आर्वी, गीतगायन मध्ये न.प. पुलगाव मधील कर्मचाऱ्यांनी बाजी मारली. मा. मनोजकुमार शहा, विभागीय सहआयुक्त तसेच सर्व मुख्याधिकारी यांचे हस्ते क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवामधील विजेत्यांना पारितोषिके वितरण करण्यात आले.

सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी  हर्षल गायकवाड, जिल्हा सह आयुक्त व राजेश भगत, मुख्याधिकारी, न.प. वर्धा यांचे मार्गदर्शनाखाली नगरपरिषद प्रशासन विभाग वर्धा व न.प. वर्धा च्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबाबत मा. मनोजकुमार शहा, विभागीय सहआयुक्त यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये