सावलीत प्रगतशील शेतकरी सन्मान सोहळा संपन्न
स्व.वामनराव पाटील गड्डमवार स्मृती प्रतिष्ठान सावलीचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष,भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष,लोकनेते स्व.वामनराव पाटील गड्डमवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून सावली येथे दोन दिवशीय भव्य शेतकरी मेळावा,मार्गदर्शन व कृषी प्रदर्शनी चे आयोजन स्व. वामनराव प्रा. गड्डमवार स्मृती प्रतिष्ठान सावलीच्या वतीने आयोजन करण्यात आले. त्यात सावली तालुक्यातील शेती क्षेत्रातील नामवंत आणि प्रगतशील तीन शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात देविदास सुरेश चौधरी रा. साखरी यांना बारमाही पीक व दूध उत्पादन यासाठी,रुमाजी गिरमाजी भोयर रा. कवठी यांना तर शेतकरी गट,माती परीक्षण लॅब क,जैविक शेती यासाठी संजय तुळशीराम मडावी रा. चकपीरंजी यांना सेंद्रिय पद्धतीने फळभाज्या व पालेभाज्यांचे बारमाही उत्पादनात अतुलनीय कामगिरी केल्याने त्यांचा स्मृति प्रतिष्ठान तर्फे सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ आणि फवारणी पंप देऊन सन्मान करण्यात आला.
विश्वशांती विद्यालय सावलीच्या प्रांगणात आयोजित शेतकरी सन्मान सोहळ्याचे उद्घाटन माजी मंत्री,आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी मंचावर अध्यक्ष म्हणून विधान परिषदेचे आमदार सुधाकर अडबाले,भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदीप गड्डमवार सचिव राजाबाळ सांगिडवार,उपाध्यक्ष अनिल स्वामी,उपाध्यक्ष नंदाताई अल्लुरवार,अनिल शिंदे,डॉ. सुरेश महाकुडकर,नंदूजी नांगरकर एड. राम मेश्राम, सुभाष सिंह गोर,उषाताई भोयर,विनायक बांगडे,नगराध्यक्ष साधनाताई वाढई,रमाताई गड्डमवार, नितीन गोहणे,संजय गड्डमवार,रवल गड्डमवार आदींची उपस्थिती होती.
भव्य शेतकरी मेळावा,मार्गदर्शन व कृषी प्रदर्शनी तथा प्रगतशील शेतकरी सन्मान सोहळ्याला सावली परिसरातील हजारो नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



