ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

1 वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीचे अपनयन करणाऱ्या आरोपीस अटक

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

गुन्ह्याची सविस्तर हकीकत अशी की, अल्पवयीन पिडीत मुलगी तिच्या आईवडीलांसह सिंदी मेघे परिसरात राहत होती. ती बाराव्या वर्गात शिकत असल्यामुळे घटनेच्या दिवशी तिच्या वडिलांनी सकाळी 10.00 तीला शाळेत सोडून दिले होते परंतु शाळा सुटल्यानंतर ती घरी परत आली नाही म्हणून तिचा सर्वत्र शोध घेतला असता, ती मिळून आली नाही. त्यामुळे कोणीतरी अज्ञात इसमाने तीला फुस लावून तिच्या शाळेतून पालकांचे कायदेशीर रखवालीतून तिचे अपनयन केले आहे. मुलीच्या आईने अशी तक्रार दुसरे दिवशी दि.05.09.2024 रोजी पो. स्टे. रामनगर येथे दिल्याने सदर तक्रारी वरून नमूद गुन्हा नोंद करून तपासावर घेण्यात आला होता.

     सदर गुन्ह्याचे पुढील तपासात यातील आरोपीने तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण करून व जवळीक साधून तीचे अपनयन केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला सदर गुन्ह्यात आरोपी करण्यात आले होते.

     घटनेपासून यातील आरोपी हा अल्पवयीन पिडीत मुलीला घेऊन फरार असून त्यांचा शोध न लागल्यामुळे दि.16.07.2024 रोजी सदर गुन्ह्याचा पुढील तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा कडे वर्ग करण्यात आला होता.

       अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे अंमलदार हे यातील आरोपी व पिडीत मुलीचा सातत्याने शोध घेत असतांना, दि.02.09.2024 रोजी यातील आरोपी व पिडीत मुलगी असे दोघेही शिवनगर, वर्धा येथे किरायाची रूम घेऊन राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली म्हणून सदर पथकाने शिवनगर, वर्धा येथे जाऊन प्राप्त माहितीनुसार छापा घातला असता,यातील पिडीत मुलगी व आरोपी असे दोघेही किरायाने घेतलेल्या रूम मध्ये मिळून आलेत. त्यांना रितसर ताब्यात घेऊन पुढील तपासकामी पो. स्टे. रामनगर येथे हस्तान्तरीत करण्यात आले आहे.

   सदरची कामगिरी मा. श्री अनुराग जैन,पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, पो. नि. श्री विनोद चौधरी, स्था. गु. शा. व स. पो. नि.माधुरी वाघाडे यांचे मार्गदर्शनात स. फौ. निरंजन वरभे,नितीन मेश्राम, नवनाथ मुंडे,शबाना शेख,अक्षय राऊत यांनी पार पाडली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये