ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. किन्नाके यांना जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या प्रशांत कोल्हेवर गुन्हा दाखल करा

अ.भा. आदिवासी विकास परिषदेची पत्रकार परिषदेत मागणी

चांदा ब्लास्ट

      उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद किन्नाके यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारण्याची धमकी देणारे तसेच महिला गार्डला धक्काबुक्की करणाऱ्या प्रशांत कोल्हेवर ॲट्रोसिटी ॲक्ट तसेच विनयभंगाचे गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रदेश महासचिव केशव तिराणिक यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.

मागील काही महिन्यात राज्य आणि देशात आदिवासी समाजावर अन्यायाची मालिका सुरू आहे. मणिपूर, मध्यप्रदेशातील घटनेनंतर राज्यातही अनेक ठिकाणी आदिवासींवर अन्याय केला जात असून, चिमूर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. किन्नाके यांना वहानगाव येथील उपसरपंच प्रशांत कोल्हे या इसमाने जातीवाचक शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. भारतीय संविधानाविषयी त्यांनी अवमानजनक विधान केले. तसेच कर्तव्यावर असलेल्या महिला गार्डला धक्काबुक्की केली. याची तक्रार डॉ. किन्नाके यांनी चिमूर पोलीस ठाण्यात केली आहे. मात्र, राजकीय दबावामुळे प्रशांत कोल्हेवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

एकंदरीत प्रशांत कोल्हे याला वाचविण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून सुरू असून, यामुळे आदिवासी समाजबांधवांमध्ये संतापाची प्रतिक्रिया उमटत आहे. प्रशांत कोल्हेवर कारवाई झाली नाही तर आदिवासी समाज आणखी आक्रमक होणार असल्याचा इशारा देत चिमूर पोलिसांनी कोल्हेवर ॲट्रोसिटी ॲक्ट आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष जनार्दन गेडाम, परशुराम उईके, गीता सलामे, भैय्या उईके, बाबुराव जुमनाके, अरविंद परचाके, अशोक मेश्राम, पुष्पा सिडाम, जीवनदास गेडाम आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये