ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शासनाने प्रतिबंधीत केलेल्या सिगारेट ची अवैधरित्या विक्री करणा-या व्यावसायिकावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दि. 28/05/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पथक पोलीस स्टेशन वर्धा शहर परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करणेकरीता पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे आरोपी रितेश शाहु याचे वर्धा शहरातील मेन रोड बढे चौक जवळ, गणेश मंदिर समोर असलेल्या वैष्णवी ट्रेडर्स या दुकानाची झडती घेतली असता, झडती दरम्यान दुकानाचे काऊंटर खाली व गोडावुन मध्ये शासनाने ठरवुन दिलेल्या कोणताही लेखी अथवा चित्रीत केलेला वैधानिक ईशारा नसलेले व त्यावर त्याच्या उत्पादनाबाबत तसेच कालबाह्य मुदतीबाबत काहीही नमुद केले नसलेले व शासनाने प्रतिबंधीत केलेले विदेशी सिगारेटचे बॉक्स व पॅकेट मिळुन आले. नमुद सिगारेट चा माल त्याने जगदिश किराणा स्टोअर्स, नागपुर येथुन खरेदी केल्याचे सांगितल्याने, मोक्कावरचं जप्ती पंचनामा कारवाई करून आरोपीचे ताब्यातून 1) mond कंपनीचे वेगवेगळ्या फ्लेवरचे विदेशी सिगारेटचे 104 बॉक्स, कि. 1,04,000 रू. 2) BLACK कंपनीचे विदेशी सिगारेटचे 18 बॉक्स, कि. 18,000 रू. 3) ESSE कंपनीचे वेगवेगळ्या फ्लेवरचे विदेशी सिगारेटचे 11 बॉक्स, कि. 11,000 रू. 4) GARAM कंपनीचे विदेशी सिगारेटचे 08 बॉक्स, कि. 16,000 रू. एकुण जु.कि. 1,49,000 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, आरोपी रितेश बन्शीलाल शाहु, वय 50 वर्ष, रा. मोहन नगर महालक्ष्मी रेसीडेन्सीच्या मागे वर्धा व जगदिश किराणा स्टोअर्स, नागपुर चा मालक यांचेविरूध्द पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे सिगारेट आणि इतर तंबाखु उत्पादने कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. अनुराग जैन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डॉ सागर कवडे सा., यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा. यांचे निर्देशाप्रमाणे, पो.उप.नी. राहुल इटेकर, पो.अं. मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, चंद्रकांत बुरंगे, रवि पुरोहित, विनोद कापसे, राहुल लुटे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये