ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जि.प.लालगुडा शाळेच्या विद्यार्थ्यांची पर्यावरण पूरक दिवाळी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

सर्व सणांमध्ये दीपावली हा वैशिष्ट्यपूर्ण सण म्हणावा लागेल. कारण तो येण्यापूर्वी आणि येताना देखील आनंद, उत्साह घेऊन येतो.म्हणून अशा या सणासुदीच्या पूर्वतयारीचा आनंद शाळेतील मुलांना मिळावा आणि आपणही सुंदर कलाकृती तयार करू शकतो हा आत्मविश्वास प्राप्त व्हावा. या उद्देशाने कोरपना तालुक्यातील जि.प. प्राथ.शाळा लालगुडा येथील विद्यार्थी व शिक्षकांनी शाळेतच दिवाळी साजरी केली.

     या शाळेतील सर्व विद्यार्थी दरवर्षी पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करीत असतात.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी पुठ्ठा आणि रंगीत कागद वापरून आकर्षक आकाश कंदील तयार केलेत. तसेच दिवाळीनिमित्त एक आगळावेगळा उपक्रम म्हणून विद्यार्थ्यांनी शाळेतच मातीचे दिवे बनविले. या दिव्यांना चिमुकल्यांनी रंग देखील दिले. आणि स्वतः काढलेल्या रंगबिरंगी रांगोळी वर शाळेतील विद्यार्थ्यांनी दिवे ठेवून सुंदर अशी आरास तयार केली.

     विद्यार्थ्यांना या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश बोबडे तथा शिक्षक गोविंद पेदेवाड यांनी मार्गदर्शन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये