ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची चिमूर विधानसभा आढावा बैठक संपन्न

चंद्रपूर जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        चिमूर येथे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे याचे आदेशाने, शिवसेना नेते तथा सचिव माजी खासदार विनायकजी राऊत साहेब यांचे नेतृत्वात, चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांतदादा कदम यांचे मार्गदर्शनात चिमूर विधानसभा क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे, महाराष्ट्र राज्य युवासेना विस्तारक मनीष जेठानी, भद्रावती तालुका प्रमुख तथा माजी नगरसेवक नरेंद्र पढाल, वरोरा विधानसभा समन्वक वैभव डहाणे यांच्या प्रमुख उपस्थित आढावा बैठक संपन्न झाली.

 या आढावा बैठक प्रसंगी जेष्ठ शिवसैनिक विधानसभा संघटक भाऊराव ठोंबरे तसेच श्यामसुंदर खांदारे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देत रविंद्र शिंदे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आले.

 चंद्रपूर जिल्हाप्रमुख यांनी पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या समस्या जाणून घेत मार्गदर्शन केले. विधानसभेतील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेट देवून त्यांचे समस्या जाणून घेण्यासंबंधाने सुचना दिल्या व घर तेथे शिवसैनिक तयार करा व विधानसभा क्षेत्रात कसून कामाला लागा असा नारा दिला यामुळे विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये नवचैतंन्य व उत्साह निर्माण झाला.

चिमुर विधानसभा आढावा बैठकीला सभेला उपजिल्हाप्रमुख प्रशांत कोल्हे, विधानसभा संघटक भाऊराव ठोंबरे, युवासेना उपजिल्हा प्रमुख नाझिम शेख,तालुका प्रमुख राजेन्द्र जाधव, माजी तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, उपतालुका प्रमुख भैय्याजी कारेकार, केबलसिंग जुनी, सुरेश गजबे, किशोर उकुंडे, विभाग प्रमुख समीर बलकी, शहर प्रमुख नितीन लोणारे, उपशहर प्रमुख मनोज तिजारे, प्रसिध्दी प्रमुख सुनिल हिंगणकर, किसन कावळै, अंकीत कारेकार, अशांक सालेकर, विक्की तडकाम, देवानंद मसराम तसेच जेष्ठ शिवसैनिक श्यामसुंदर खांदारे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये