ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नगर परिषदेमार्फत मुस्लिम कब्रस्थान येथे लाईट व फॅनची व्यवस्था करण्यात आली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा येथे मुस्लिम समाजाला कब्रस्तान मध्ये जनाजा(डोला) ची रात्रीच्या वेळी नमाज अदा करण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत होता. याबाबत जय शिवसंग्राम ने नगर परिषदे कडे लाईट व पंखे लाऊन देण्याची मागणी केली होती.
नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी व प्रशासक अरुण मोकळ यांनी निवेदनाची तत्काळ दखल घेऊन मुस्लिम कब्रस्तान मध्ये लाइटिंग व फॅन चे काम पूर्ण करून दिले. काल रात्री दोन मयत झाले होते.
या दोन (मयतीचे) जनाजाची नमाज अदा करते वेळी रात्रीच्या वेळी सभा मंडपात रोषणाई होती. मुस्लिम समाजाच्या वतीने मुख्याधिकारी व प्रशासक अरुण मोकळ यांचे आभार मानण्यात आले..