ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मध्ये सिंनगावं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिल्ह्यातुन द्वितीय

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या महत्त्वकांक्षी अभियानांतर्गत तालुकास्तरीय मूल्यमापनामध्ये जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, सिनगाव जहा. जिल्हा परिषद शाळा विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता.

तालुका स्तरावरील 3,00000/- तीन लक्ष रुपयांचे बक्षीसही प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषद चेअधिकारी यांनी जिल्हा परिषद शाळा,सिंनगावं ची तपासणी केली व ही शाळा बुलडाणा जिल्ह्यातुन सुद्धा दुसरा क्रमांक पटकावला आहे व 7.00000 (सात लाख रुपयाचे) बशीस ही प्राप्त झाले आहे.

हे यश म्हणजे एका सांघिक भावनेने केलेल्या कार्याचे फलित आहे.मागील एक महिनाभरापासून गावकरी,पालक,शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामपंचायत कार्यालय,गावातील सामाजिक संघटना, सर्व शिक्षक,विद्यार्थी यासाठी सातत्याने खूप परिश्रम घेत होते. पुरस्कार प्राप्त होण्यासाठी सरपंच सौ सुनीता गजानन डोईफोडे,ग्राम विकास सहकारी सोसायटीचे अध्यक्ष शालीकराम डोईफोडे, तंटामुक्ती अध्यक्ष बबनराव डोईफोडे, मुख्याध्यापक रामप्रसाद केवट,व सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग, तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य व गावकऱ्यांनी महत्वाचे योगदान दिले आहे.

 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये