ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चिंतामणी महाविद्यालयात संत गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट

         चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळ, बल्लारपूर द्वारा संचालित चिंतामणी महाविद्यालय, घुग्घूस जिल्हा चंद्रपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने 23/02/ 2024 रोजी संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवि धारपवार यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करून संत गाडगे महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकले. तसेच विद्यार्थ्यांना संत गाडगे महाराजांच्या कार्याविषयी उजाळा देऊन त्यांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. महेंद्र कुंभारे सांस्कृतिक विभागप्रमुख यांनी संत गाडगे महाराज हे स्वच्छतेचे पुजारी असून मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे असे सांगितले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. डॉ. नितिन कावडकर यांनी आपल्या प्रस्तावितेतून संत गाडगे महाराज यांच्या कार्यांचा उलगडा करून विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मंगेश जमदाडे यांनी केले. तर आभार प्रा. कु. स्नेहा उईके यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयातील प्रा. डॉ. नितिन कावडकर, प्रा. मंगेश जमदाडे, प्रा. गणेश सुरजुसे डॉ. माधव कांडणगिरे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम करून मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये