ताज्या घडामोडी

भद्रावती – वरोरा विधानसभा क्षेत्रात पंचरंगी लढत !

निवडणुकीत चढली चांगलीच रंगत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाल्यातनंतर भद्रावती- वरोरा विधानसभा क्षेत्रात निवडणुकीचा रंग चढत चालला असून सध्य स्थितीत या क्षेत्रात पंचरंगी लढतीची शक्यता दिसून येत आहे .या अटीतटीच्या लढतीत या निवडणुकीत बाजी मारेल कोण? याचा अंदाज करणे कठीण झाले आहे.महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून या क्षेत्रातून खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे हे निवडणूक लढवीत आहे या क्षेत्रात काँग्रेसची पारंपारिक मतांची ताकद आहे व खासदार प्रतिभा धानोरकरांचे कुशल नेतृत्व आहे.

प्रवीण काकडे यांना निवडून आणण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कंबर कसली असून या क्षेत्रात काँग्रेसचे उमेदवार प्रवीण काकडे हे विजयाचे दावेदार समजले जाते. महायुतीचे उमेदवार म्हणून या क्षेत्रातून करण देवतळे हे निवडणूक लढवीत आहे करण देवतळे यांच्या मागे यांच्या आजोबांचा व वडिलांचा राजकीय वारसा आहे. त्यामुळे करण देवतळे देखील विजयाचे दावेदार समजले जाते. माजी नगराध्यक्ष अहतेशाम अली हे प्रहार जनशक्ती पक्षाकडून बॅट हे चिन्ह घेऊन या निवडणुकीत संपूर्ण ताकतीनिशी उभे राहुल निवडणूक लढवीत आहे. वरोरा शहर व तालुका येथे त्यांनी अनेक विकास कामे केली आहे त्यामुळे ते या निवडणुकीत दखलपात्र उमेदवार ठरले आहे. काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर भद्रावती शहराचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहे.

भद्रावती शहर तथा तालुक्यात त्यांचा चांगला प्रभाव असून त्यांच्या मागे वंचित आघाडीची गठ्ठा मते असल्या मुळे त्यांचे पारडे सुद्धा या निवडणुकीत जड वाटत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी महाविकास आघाडी विरोधात बंड करून निवडणुकीत उभे राहिले राहून आपले दंड थोपाटले आहे क्षेत्रात त्याचा चांगलाच प्रभाव असून कार्यकर्त्यांची ताकद त्यांच्या मागे एकवटली असल्याने ते या निवडणुकीत तुल्यबळ लढत देत आहे. सुप्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉक्टर चेतन

कुटेमाटे हे अपक्ष म्हणून शेतकरी चिन्हावर निवडणूक लढवीत आहे. उच्च विभूषित असलेल्या डॉक्टर चेतन खुटेमाटे यांचा उच्च शिक्षित वर्गात बऱ्यापैकी प्रभाव दिसून येत आहे त्यामुळे ते देखील येथे उल्लेखनीय उमेदवार म्हणून पुढे येत आहे. मनसेचे उमेदवार म्हणून प्रवीण सूर निवडणुकीच्या मैदानात आहे. पाटाळा-माजरी क्षेत्रात त्यांचा मोठा प्रभाव आहे यामुळे ते देखील या निवडणुकीत दखलपात्र ठरत आहे. या निवडणुकीत काँग्रेस च्या हाताची वज्रमुठ इथे इतरांवर फिरेल कि विधानसभेच्या तलावात कमळ फुलेल, की या मैदानात अहेतेशाम अलीची बॅट तळपणार की अनिल धानोकर यांचे सिलेंडर भडकणार की चेतन

खुटेमाटे हे शेतकऱ्यांच्या माध्यमातून मतांचे पीक काढणार की मुकेश जीवतोडे यांच्या कुकरची शिट्टी वाजणार की प्रवीण सूर यांचे इंजिन चौफेर धावणार हे येणारा काळच सांगणार!

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये