ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मातृतीर्थाच्या विकासासाठी ४७ कोटी मंजूर 

आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नांना यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

मातृतिर्थ सिंदखेडराजा मतदार संघाच्या रस्ते व इतर विकासासाठी या भागाचे आमदार माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नाने ४७ कोटी रुपयांच्या निधीला नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंजुरात मिळाली आहे.

सिंदखेड राजा मतदार संघाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी मतदारसंघातील रस्ते विकास व इतर विकास कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला असल्याने विकासात्मक कामासाठी 47 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.यामध्ये अमोना, देऊळगाव धनगर,भरोसा,मेरा बु,मेरा खुर्द शेंदुर्जन 285.3,तांदुळवाडी दरेगाव १२१.५२,अमडापूर लव्हाळा,दुसरबीड, राहेरी,वरदडी १५०,लव्हाळा,अमडापूर, दुसरबीड, राहेरी, वरदडी (शेंदुर्जन गावाजवळ) १५०,मलगी, इसरूळ, देऊळगाव मही,खैरव, वाकद १५०,सावंगी,वाघजई,सावखेड तेजन, वाघोरा १५०, देऊळगाव राजा ,गिरोली बु,निमखेड,गोळेगाव १८०, खल्याळ गव्हाण,सिनगांव जहागीर पांग्रा,देऊळगाव राजा, उंबरखेड,जवळखेड, बोराखेडी बावरा २००,तर रस्ता सुधारणा,मजबुतीकरण व रुंदीकरणासाठी मतदार संघातील अमडापूर, लव्हाळा, दुसरबीड,राहेरी, वरदडी १५०, अमडापूर,लव्हाळ, दुसरबीड,वरदडी २०४,मेरा बु, सावखेड नागरे, पाडळी शिंदे, खैरव, टाकरखेड तढेगाव, दुसरबीड ३००,खल्याळ गव्हाण, सिनगांव जहागीर पांग्री, देऊळगाव राजा, उंबरखेड, जवळखेड १००,असोला जहागीर,सिंदखेड राजा ,शिवनी टाका, डावरगाव मजबुतीकरण १००, अंढेरा, मलकापूर,पांग्रा, बीबी, किनगाव जट्टू,भिमराळा, वझर, रुंदीकरण सुधारण्यासाठी १२५.३५,सिंदखेड राजा ते बामखेड ३६०, पिंपळगाव चिलमखा,किन्ही पवार,पांग्री १००, देऊळगाव राजा,सावखेड भोई ते जिल्हा हद्द १५०, रामनगर, हनवतखेड, हिवरागडलिंग ७७.५०,साखरखेर्डा, पिंपळगाव सोनारा ७७.५०,कुंभारी जोड रस्ता १०० डोरव्ही,पोपळ शिवणी, हिवडा गडलिंग, दरेगाव, पिंपळगाव सोनारा, शिदी,रताळी, सवडत ,गुंज ७७.५०, तांदुळवाडी ते दरेगाव १०१,सिनगाव जहागीर, मेहुणा राजा, रोहणा,सावंगी, हिवरखेड, किनगाव राजा, उमरद, आडगांव राजा, वरदडी संरक्षण भिंत व जोड रस्त्याचे बांधकाम १००,सिंदखेड राजा तालुक्यातील ३६ तलाठी कार्यालय बांधकाम ५४०,देऊळगाव राजा तालुक्यातील ३८ तलाठी कार्यालय बांधकाम ५७० मंजुर झाले आहे.

सिंदखेड राजा मतदार संघासाठी हिवाळी अधिवेशनामध्ये ४७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यामधून मतदारसंघाचा कायापालट होण्यास मदत होणार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये