Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

तहसिल कार्यालय कोरपण्याला पूर्णवेळ तहसीलदार कधी मिळणार ?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

– कोरपना येथील तहसील कार्यालयातील तहसीलदाराचे प्रमुख पद मागील महिन्याभरापासून रिक्त आहे. त्यामुळे येथील कारभार प्रभारी अधिकाऱ्याच्या भरोशावर सुरू आहे.

१५ ऑगस्ट १९९२ ला राजुरा तालुक्याचे विभाजन करून कोरपना या स्वतंत्र तालुक्याची निर्मिती झाली. या तालुक्यात ११३ गावाचा समावेश आहे. हा तालुका औद्योगिक व कृषी दृष्ट्या महत्वपूर्ण म्हणून ओळखला जातो. मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या प्रमुख अधिकाऱ्याचेच पद रिक्त असल्याने येथील कामे खोळंबली आहे. विधानसभा निवडणूक कालावधीत या ठिकाणी तहसीलदार म्हणून पल्लवी आखरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या स्थानांतरानंतर आज गायत येथे पूर्णवेळ तहसीलदाराची नियुक्ती करण्यात आली नाही. सद्यस्थितीत या कार्यालयाचा कार्यभार राजुरा येथील तहसीलदार सांभाळत आहे. दोन्ही तालुक्याचे कार्यक्षेत्र मोठे व प्रशासकीय कारभार अधिक असल्याने त्यांना तारेवरची कसरत करत कामकाज सांभाळावे लागत आहे. त्यामुळे या त्वरित पूर्णवेळ तहसीलदाराची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी तालुका वासियांकडून होत आहे.

रिक्त पदामुळे कामकाज प्रभावित

कोरपना येथे तहसील कार्यालयात प्रमुख असलेल्या तहसीलदार सह एक नायब तहसीलदार, चार महसूल सहाय्यक, दोन शिपाई, पुरवठा विभागात एक पुरवठा निरीक्षक, एक कनिष्ठ लिपीकाचे पद रिक्त आहे. त्यामुळे एकाच अधिकाऱ्याला दोन – दोन टेबलचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागत आहे. यामुळे प्रशासकीय कामातील गती कमी झाली आहे. याचा फटका तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना बसतो आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये