ताज्या घडामोडी

भद्रावती बस स्थानकातील हॉटेलला आग

साहित्य जळून खाक लाखोचे नुकसान

चांदा ब्लास्ट :

अतुल कोल्हे भद्रावती :-
शहरातील बस स्थानक आवारातील बाबूजी स्टील स्टाल या हॉटेलला आग लागून हॉटेल जळून खाक झाले. सदर घटना भद्रावती बस स्थानक आवारात रात्रीच्या वेळेस घडली. मोठ्या प्रयत्नाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी आग विझवेपर्यंत हॉटेल जळून खाक झाले होते. या घटनेत हॉटेल मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या आगीचे कारण मात्र कळू शकले नाही. बसस्थानकाचे आवारात गुप्ता यांचे बाबूजी टी स्टाल नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमधुन खाद्यपदार्थ तथा इतर वस्तू विकल्या जातात. या हॉटेलला रात्रोला दहा वाजताच्या सुमारास अचानक आग लागली.आग लागल्याचे समजतात अग्निशामक दलाला पाचारण करून व नागरिकांच्या मदतीने ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र या आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत हॉटेलमधील फर्निचर,माल तथा इतर साहित्य जळून खाक झाले होते. या हॉटेलच्या सभोवताल जवळ अन्य दुकाने नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये