ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैधरित्या घाटातुन रेतीची वाहतुक

संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 मा. पोलीस अधीक्षक सा, व मा. अप्पर पोलीस अधीक्षक सा. यांचे मार्गदर्षनात सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल ल. चव्हाण, साहेब पुलगांव यांचे पथकातील पोउपनि सुधिर बनकर सोबत पिश/365 संदीप बोरबन, पोशि/1464 रामदास दराडे यांनी पोलीस स्टेशन अल्लीपुर हद्दीतील आरोपी हे संगनमत करून अवैधरित्या वर्धा नदी पात्रातील वारा पोटी घाटातुन रेती चोरून वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने नमुद आरोपीतांनावर नमुद घटना ता. वेळी व स्थळी छापा टाकुन 03 ट्रॅक्टर चालक व मालका यांना ताब्यात घेवुन त्यांचे विरूध्द कायदेशीर कार्यवाही करून दोन पंचासमक्ष ट्रॅक्टर व ट्रॉलीसह 22,65,000/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

 नमुद घटना ता. वेळी व स्थळी यातील नमुद आरोपीतांवर गुप्त बातमीदार कडुन मिळालेल्या माहीती वरून रेड केला असता आरोपी 1. तुषार खुनकर, रा. सोनेगांव खुनकर, ता. हिंगणघाट जि. वर्धा (मालक) 2. किरण हिरामन आडे, रा. सोनेगांव खुनकर, ता. हिंगणघाट जि. वर्धा (चालक) 3. त्र्यंबक ससाने, रा. मोझरी, ता. हिंगणघाट जि. वर्धा (मालक) 4. षांकर येरमे, रा. मोझरी, ता. हिंगणघाट जि. वर्धा (चालक) 5. बंडु गजानन उमाटे, रा. वरूड, ता. हिंगणघाट जि. वर्धा (मालक) 6. सौरभ वाल्मीकराव उईके, रा. वरूड, ता. हिंगणघाट जि. वर्धा (चालक)हे संगनमताने आपले ताब्यातील ट्रॅक्टर ट्रॅाली ने अवैधरित्या रेती चोरून वाहतुक करीत असतांना वर्धा नदीच्या पात्रातील वारापोटी घाटात 03 ट्रॅक्टर वाहतुक करतांना मिळुन आल्याने ट्रॅक्टर चालक व मालका विरूध्द कायदेशीर कार्यवाही करून दोन पंचासमक्ष घटनास्थळ जप्तीपंचनामा कार्यवाही प्रमाणे 1.एक एम.एच. 32 ए.एच. 4997 हिरव्या रंगाचा जॉन्डेर कंपनीचा ट्रॅक्टर अंदाजे किंमत 6,00,000/- रू. व एक हिरव्या रंगाची ट्रॉली क्रमांक नसलेली अंदाजे किंमत 1,50,000/- रू. 2.एक एम.एच. 32 ए.एच. 9759 हिरव्या रंगाचा जॉन्डेर कंपनीचा ट्रॅक्टर अंदाजे किंमत 6,00,000/- रू. व एक हिरव्या रंगाची ट्रॉली क्रमांक नसलेली अंदाजे किंमत 1,50,000/- रू. 3.एक विना क्रमांकाचा स्वराज कंपनीच लाल रंगाचा ट्रॅक्टर अंदाजे किंमत 6,00,000/-रू. व एक लाल रंगाची ट्रॉली क्रमांक नसलेली अंदाजे किंमत 1,50,000 रू. 4.रेती किंमत 1,50,000/-एकुण जुमला किंमत 22,65,000/- रू चा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये