ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बसस्थानक येथील गर्दीमध्ये सोन्याचे दागीने चोरी करणाऱ्या महीला ताब्यात

महीला आरोपींचे ताब्यातून सोन्याचे दागीने एकुण 35 हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 06/03/2025 रोजी फिर्यादी सौ.वैशाली विजयराव रघाटाटे रा.एकुर्ली तालुका जिल्हा वर्धा हे वर्धा बस स्थानक, येथून एकुर्ली कडे जात असताना लोकांची गर्दीचा फायदा घेवून फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र कुणीतरी अज्ञात चोट्याने चोरून नेल्याबाबत पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा वर्धा करीत असतांना दिनांक 10/03/2025 रोजी बातमीदार कडुन माहिती मिळाली की, सोनार लाईन वर्धा येथे दोन महिला सोने विकण्यासाठी फिरत आहे. अशा माहितीवरून महिला नामे 1) सौ. राधिका शुभम पवार वय 23 वर्ष रा. सुदर्शन व 2) विधी संघर्षित बालीका त्यांचे ताब्यातून दोन छोटे सोन्याचे डोरली, चार मोठे सोन्याचे मणी व लहान सोन्याचे मणी 24 असे 3 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण 35,000/- रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाआहे.

   सदरची कारवाईbमा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक वर्धा, मा. डाॅ. श्री. सागर कवडे, अप्पर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.उपनि. सलाम कुरेशी, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, रामकिसन इप्पर, अरविंद इंगोले, राहुल अधवाल, महीला पोलीस पल्लवी बोबडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये