ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पी.एम.श्री. स्कूल जवाहर नवोदय विद्यालय चंद्रपूर च्या विद्यार्थ्यांची भारतीय विज्ञान संस्था बंगळुरू येथे ‘वैज्ञानिक ज्ञान संवर्धन’ प्रशिक्षणासाठी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        नवोदय विद्यालय समितीच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येणारा विज्ञान समृद्धी कार्यक्रम हा विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि सर्जनशीलतेची जाणीव निर्माण करणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या वर्षीचे प्रशिक्षण २८ एप्रिल ते २४ मे २०२५ या कालावधीत भारतातील अग्रगण्य संशोधन संस्था – IISc भारतीय विज्ञान संस्था बंगळुरू येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सत्रं, प्रयोग, प्रात्यक्षिकं व चर्चासत्रांमधून विज्ञान विषयात सखोल समज विकसित करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक बळकट होईल.

पुणे विभागातून निवड झालेल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये चंद्रपूर, बीड आणि संभाजीनगर येथील विद्यार्थी सहभागी होत आहेत. त्यांच्या सोबत पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, तळोधी ( बा ) चंद्रपूर येथील पीजीटी (गणित) कु. चेष्टा रहेजा या मार्गदर्शक समन्वयक आहेत.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे व त्यांच्या शाळांची माहिती पुढीलप्रमाणे:

पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, तळोधी, ( बा ) चंद्रपूर ,मधून आशय डोंगरवार, संस्कार भरने.

पी.एम .श्री. स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, बीड मधून- साई इंगळे, सूरज बांगर तसेच

पी.एम .श्री. स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, संभाजीनगर – श्रद्धा उबाळे

या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणून समन्वयक पी.जी. टी. (गणित) कु चेष्टा रहेजा या जबाबदारी सांभाळणार आहे .”

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना प्राचार्य सू. श्री. मीना मनी यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी या संधीचा पुरेपूर लाभ घेत पुढील शैक्षणिक प्रवासात वैज्ञानिक विचारांची वाट चोखाळावी.”

उपप्राचार्य डॉ. मनोज वानखडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना म्हटले की, “या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना देशातील सर्वोत्तम वैज्ञानिक वातावरणात शिकण्याची संधी मिळत असून, याचा उपयोग त्यांनी आपली जिज्ञासा वाढवण्यासाठी करावा.”

हा कार्यक्रम नवोदय विद्यालय समितीच्या शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर आपल्या ज्ञानाचे व कौशल्याचे प्रदर्शन करण्याची प्रेरणादायी संधी देतो.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये