ताज्या घडामोडी

आय ए एस तहसीलदाराचा दणका

अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन करणाऱ्या सात वाहनावर धडक कार्यवाही

चांदा ब्लास्ट –

प्रमोद गिरडकर

कोरपणा तालुक्यात अवध रित्या गौण खनिजाचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक धडक कारवाई कोरपना चे तहसीलदार रणजित यादव यांनी केली.
यात चार हायवा , पाच ट्रॅक्टर याचा समावेश आहे.चार हायवा कडून एकूण एक कोटी बासस्ट हजार तर पाच ट्रॅक्टर कडून एकूण पाच लाख अठयातर हजार असा एक करोड चौसष्ट लाख रुपयाचा दंड आकारण्यात आला. यामध्ये
जी आर एन्फ्रा कंपनीचे दोन हायवा हे नियमबाह्यरीत्या रात्री मुरुमाची वाहतूक करताना.तर इतर दोन हायवा व ट्रॅक्टर हे वाहन रेतीची वाहतूक करताना पकडण्यात आले. गेल्या महिनाभरापासून परिसरात मोठया प्रमाणात गौण खनिजाची अवैध वाहतूक करीत होते .कोडशी घाटावरून रेतीची वाहतूक ही महसूल विभागाला डोके दुखी ठरली होती मात्र आय ए एस तहसीलदार यांनी अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टर माफीयाच्या मुसक्या आवरल्या सदर कारवाई कोडशी, गडचांदूर येथे करण्यात आली. या कारवाईमुळे अवध रित्या गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे. परिषाविधिन आय ए एस तहसिलदार रणजित यादव यांनी त्यांच्या नियुक्ती नंतर अवघ्या पंधरा ते वीस दिवसांच्या कालावधीत ही धडक कारवाई करून तस्करांवर चांगलाच आळा घातला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये