ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दे राजा तालुका वकील संघातील सदस्य नी न्यायालयात लावलेल्या झाडांची निगा राखण्यासाठी केला संकल्प 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा न्यायालयात मागील वर्षी वृक्षा रोपण केलेले होतं तसेच न्यायालय परिसरा मध्ये फुलांचे, फळांचे, वडाचे झाडें लावून परिसर हिरवा गार केला होता परंतु उन्हाळ्याचे दिवस असल्याने कडक असे ऊन पडल्याने तसेच फुलांच्या झाडाच्या व इतर झाडांच्या बाजूला गवत वाढलेले होते त्यामुळे शो ची झाडें लावलेले त्याची शोभा पुन्हा येणेसाठी तालुका वकील संघातील सदस्य ऍड शाम खैरे, ऍड सदानंद वाघ, यांनी 1एप्रिल रोजी खुरपे, फावडे हातात घेऊन स्वतः खुरपणी, निंदनी करून न्यायालय परिसर सुद्धा आपल्या घरा प्रमाणे आहे आणि न्यायालतील वकील बांधव आपल्या कुटुंबा प्रमाणे आहेत या उद्देशाने न्यायालय परिसर कसा सुंदर व स्वच्छ राहील यासाठी दुपारच्या सत्रातिल सुटी मध्ये झाडांची निगा राखणे साठी काम केले. यावेळी तालुका वकिल संघांचे जेष्ठ सदस्य ऍड प्रदीप घेवंदे तसेच ऍड निलेश रामाने, ऍड. अनिल शेळके,गजानन खांडेभराड व कोल्हे.उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये